| 1 . | मी दिलेली माहीती माझ्या आकलनाप्रमाणे खरी असून या माहितीच्या सत्यतेची पूर्ण जबाबदारी माझी राहील. सदर माहितीमध्ये काही खोटे अथवा चुकीचे असल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते याची मला जाणीव आहे. |
| 2 . | मी स्वेच्छेने विवाह नोंदणी करू इच्छिणाऱ्याला सर्व गोष्टींची कल्पना देऊन आणि त्यांची संमती घेऊन नोंदणी करत असून विवाहा संबंधीची सर्व जबाबदारी माझी राहील. |
| 3 . | सोयरीक वधु वर मैत्र ही संस्था अनुरूप वधू आणि वर म्हणजेच स्थळे सुचविण्याची सेवा देणारी संस्था असून यापलीकडे किंवा या पेक्षा वेगळी अशी कुठलीही सेवा सोयरीक वधू वर मैत्रकडून दिली जात नाही याची मला माहिती असून हे मला मान्य आहे. |
| 4 . | मी सोयरीक वधू वर मैत्र या संस्थेला दिलेली सर्व माहिती सोयरीक वधू वर मैत्र ही संस्था अनुरूप स्थळांना पुरवू शकतात, त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करू शकतात अथवा इतर माध्यमांद्वारे एक अथवा अनेकांना पुरवू शकतात याच मला जाणिव असून त्यासाठी माझी परवानगी आहे. |
| 5 . | सोयरीक वधु वर मैत्र ही संस्था अनुरूप स्थळ सुचविण्या व्यतिरिक्त हुंडा अथवा इतर कुठल्याही आर्थिक देवाण-घेवाणीच्या विरोधात असून अनुरूप स्थळांची अथवा त्यांच्या वतीने कुणीही काही आर्थिक देवाण-घेवाण केल्यास झालेल्या फसवणुकीची सोयरीक वधू वर मैत्र या संस्थेचा संबंध नसेल याची मला कल्पना असून हे मला मान्य आहे. |
| 6 . | सोयरीक वधू वर मैत्र ही संस्था नोंदणीकृत व्यक्तींना अनुरूप स्थळे सुचविण्याचे काम करते, यासाठी जे काही सेवा शुल्क घेतले जाते ते ना परत शुल्क आहे याचा मला जाणीव असून ते मला मान्य आहे. |
| 7 . | सोयरीक वधू वर मैत्र या संस्थेच्या सर्व सेवांविषयी मला माहिती असून, या सर्व सेवांच्या नियम व अटी मला मान्य आहेत. |
| 8 . | सोयरीक वधू वर मैत्रच्या प्रिमियम सेवेमध्ये वधू आणि वर यांचा लग्नासाठी संमती मिळेपर्यंतच सोयरीक वधू वर मैत्रची जबाबदारी राहील याची मला माहिती असून हे मला मान्य आहे. |
| 9 . | सोयरीक वधू वर मैत्र व्यतिरिक्त इतर अस्थापना अथवा व्यक्तीकडून माझे अथवा मी नोंदणी केलेल्या वधू/वरचे लग्न जमल्यास सोयरीक वधू वर मैत्र या संस्थेने आकारलेले सेवा शुल्क मला परत मागण्याचा अधिकार नाही आणि मी ते सेवा शुल्क पुन्हा मागणार नाही तसेच इतर ठिकाणावरून लग्न जमल्यास सोयरीक वधू वर मैत्र ला सदर गोष्टीची कल्पना देणे माझ्यावर बंधनकारक असून हे मला मान्य आहे. |
| 10. | नवीन नोंदणी किंवा मुदतवाढ केल्यास त्या निगडित रक्कम भरावी लागेल. |
| 11. | समोरील स्थळाकडून काही अडचण येत असल्यास त्वरित संस्थेला कळवावे. |
| 12. | सोयरीक वधू वर मैत्र यांच्या सर्व नियम व अटी मला मान्य असून त्यांचे पालन करण्यास मी बद्ध आहे. |